आर.के.वाईन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द

0

जळगाव– जळगावातील अजिंठा चौफुलीवरील आर.के.वाईन्सनर लॉकडाऊनमध्ये गोडावूनवरुन चारचाकीतून मद्याची वाहतूक करुन मद्यविक्री केली जात होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने 12 एप्रिल रोजी पहाटे 3.15 वाजेच्या सुमारास कारवाई करुन 1 लाख 10 हजार 54 रुपयांची देशी विदेशी दारु, कारसह दोन जणांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अहवाल व चौकशीअंती आर.के.वाईन्सचा मद्यविक्रीचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची शनिवारी पारित केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आर.के.वाईन्सचा गोडावून तसेच विविधी बाबींची चौकशी करुन अहवाल तयार केला होता. यात विभागाने दिलेल्या परवागनी नुसार गोडावूनची रचनेत फेरबदल, अनधिकृत प्रवेशद्वार आढळून आले होते. तसेच पुस्तकी साठ्यापेक्षा कमी प्रत्यक्ष साठा कमी मिळून आलेला आहे, टुबर्ग प्रिमीयम बियर स्ट्रॉगचा अनधिकृतरित्या विना वाहतूक परवाना केल्यासह अनेक अनागोंदी तसेच बेकायदेशीर गोष्टी समोर आल्या होत्या होत्या. संबंधित चौकशी अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे ÷उल्लंघन, अवैध दारुची वाहतूक व विक्री करुन अटी शर्तीचा भंग केल्याने त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आर.के.वाईनचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे.