मुंबई : चेंबूर येथील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारी अडीच वाजता भीषण आग लागली. आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. जवानांनी 11 गाड्यांच्या मदतीने ही आग शर्थीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली. आगीत स्टुडिओ 1, स्टुडिओ 2 जळून खाक झाले. सामानाचेही मोठे नुकसान झाले आहे.
आगीत सुपर डान्सर 2 शोचाही सेट जळून खाक झाला. सुदैवाने शोचा एकही क्रू मेंबर उपस्थित नव्हता. 1948 मध्ये ज्येष्ठ अमिनेते राज कपूर यांनी हा स्टुडिओ सुरु केला होता. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्नितांडवामुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. आगीची तीव्रता मोठी असल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी वाहतूक थांबवली होती.