आर.बी.पाटील विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

0

जळगाव। शहरातील आर.बी. पाटील विद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृह पटांगणात मंगळवार 15 ऑगस्ट 2017 रोजीचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाचे अध्यक्ष आर.बी.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शंंतनू पाटील, डॉ. संजय उत्तमराव पाटील, सचिव योगेश पाटील, मिलिंद पाटील, स्नेहा पाटील, मोहित पाटील, राज पाटील उपस्थित होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी भगवी, पांढरी व हिरवी टोपी घालून भारताच्या नकाशाच्या आकारात उभे राहून मध्यवर्ती ठिकाणी अशोक चक्रासह तिरंगी झेंडयास मानवंदना दिली. या अतिशय वेगळया स्वरुपामुळे विद्यार्थ्यांमध्ये उस्फुर्त सहभाग दिसून आला. तसेच स्वातंत्र्य सेनानी, व विविध राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेतही काही विद्यार्थी उपस्थित होते. नंतर देशभक्ती गिते, नाटीकांचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
यावेळी शाळेचे प्रतिभा शिवदे, मुख्याधापक मनोज पाटील, संदीप ठोसर, स्वप्नील पाटील, तेजस्वीनी वाणी, मीरा परदेसी, सुवर्णा शिंपी, दुलारी प्रजापत, वंदना नारखेडे, सुनील पाटील, केतकी पाटील, निला घटक, सीमा लढ्ढा, तनुजा कोल्हे, सविता वानखेडे, वर्षा पाटील, मनीषा मोरडीया, सौ. जोशी, सर्कल कम्प्युटरच्या संचालिका धनश्री कलंत्री, तसेच सुभाष महाजन, डी.एम. महाजन, शशीकांत फेगडे, राजेश पाटील, सुनील चौधरी, अनील देठे, मालोजी पवार, काजल सुर्यवंशी, जयश्री धनगर, प्रताप चौधरी, शरद सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.