शिरपूर। शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या तब्ब्ल 17 विद्यार्थ्यांनी जेईई (जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन-2017 परीक्षेत सुयश प्राप्त केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. प्रवर्गाप्रमाणे पात्रतेसाठी सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 81 गुण, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 49 गुण, अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना 32 गुण, अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना 27 गुण, शारीरिकदृष्टया विकलांग विद्यार्थ्यांना 1 गुण असे जाहीर झाले आहे. आर.सी.पटेल इंग्लिश स्कूलचे 10 विद्यार्थी जेईई परीक्षेत पात्र ठरले आहेत. कुणाल प्रल्हाद मगरे (एस.सी., 118 गुण), मयुरी रविंद्र रत्नपारखी (ओबीसी, 70 गुण), नेहा अविनाश पाटील (ओबीसी, 68 गुण), गणेश दिलीप कुंभार (ओबीसी, 60 गुण), चेतन गोपाल चौधरी ओबीसी, 58 गुण), मनिष शरद पाटील (ओबीसी, 54 गुण), गौरव बिहारीप्रसाद अग्रवाल (शारी.विकलांग, 51 गुण), प्राची मनोज अग्रवाल (शारी. विकलांग, 50 गुण), तेजस सुरेश मोरे (एस.सी., 35 गुण), मिनल किशोर तुंगार (एस.टी., 35 गुण) यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
तसेच आर.सी.पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे विनीत पांडुरंग पाटील (ओबीसी, 64 गुण), ऋषिकेश वासुदेव चौधरी (ओबीसी, 58 गुण), तेजस अशोक पाटील (ओबीसी, 52 गुण), विशाल सुभाष पाटील (ओबीसी, 50 गुण) यांनी यश प्राप्त केले. एच.आर.पटेल कन्या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून विद्या सुधीर सुर्यवंशी (ओबीसी, 54 गुण), अंजना कालुसिंग वळवी एस.टी., 34 गुण), राजेश्वरी राजेंद्र घुगे (ओबीसी, 48 गुण) या विद्यार्थिनी यशस्वी झाल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी.व्ही.पाटील, प्राचार्या एम.एस.अग्रवाल, प्राचार्य रवि बेलाडकर आदींनी कौतुक केले आहे.