शिरपूर । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे आयोजित ’आविष्कार 2017’चा प्रथम टप्पा शिरपूर येथे जिल्हास्तरीय आविष्कार नुकताच पार पडला. यात आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयातून सोशल सायन्स, कला, प्युअर सायन्स, शेतीशास्त्र औषधीनिर्माणशास्र अश्या विविध शाखांमधील संशोधन पदवी, पदवीत्तर, शिक्षक विविध स्तरावर पोस्टर व मॉडेल या दोनही पद्धतींनी सादर करण्यात आले. यात आर.सी.पटेल फार्मसी शिरपूरच्या 30 संशोधन प्रकल्पाची विद्यापीठस्तरावर सादर करण्यासाठी निवड झाली. विद्यापीठ स्तरावर प्रथम दिवशी पोस्टर प्रेसेंटेशन नंतर फार्मसी व मेडिसिन या विषयाअंतर्गत स्तरावरून ललित बिरारी, हर्षल पवार, युगंधरा पाटील, नीलिमा पाटील यांची पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन साठी निवड झाली.
विविध चाचण्या
सर्व चाचण्या पार करून महाविद्यलयाला 6 पारितोषिके प्राप्त झाले. विजेत्यांनी विद्यपीठात महाविद्यालयाचे वर्चस्व सिद्ध केले. फार्मसी आणि मेडिसिन या विषयाअंतर्गत पदव्युत्तर स्तरावर डॉ.व्ही.जी.कुचके यांच्या मार्गादर्शनाने ललित बिरारी व हर्षल पवार यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. फार्मसीमधून पायल पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्यांना डॉ एच. एस. महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. टिचर स्तरातून प्रा. प्रशांत चौधरी , प्रा. मनोज गिरासे यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक मिळवला. तसेच डॉ. हरून पटेल यांच्या मार्गादर्शनांतर्गत प्युअर सायन्स या विषयासाठी पदव्युत्तर स्तरातून हर्षा जाधव, इकरार महंम्मद यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
प्राध्यापकांचे मार्गदर्शन
प्रा.हेमाक्षी चौधरी यांनी हुमनीटीज ऍण्ड फाईन आर्टस् मधून प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेते राहुरी येथे होणार्या ‘राज्यस्तरीय आविष्कार’ स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अविष्कार 2017 मध्ये संशोधन सादर करण्यासाठी महाविद्यालयीन समिती प्रमुख म्हणून डॉ एस . एस. चालीकवार व समिती सदस्य प्रा. डॉ. एम. जी. कळसकर, डॉ. व्ही. जी. कुचके, प्रा. व्ही.सी. गुरुमुखी, प्राध्यापिका एन. एल. पाटील व प्रा. सुरज चौधरी यांचे व इतर सर्व प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
विजेत्यांचे कौतूक
एकूण 10 संशोधन प्रकल्प पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन साठी निवडले. प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांनी अविष्कार मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व प्राद्यापकांचेव प्राद्यापकांच्या योगदानाचे कौतुक केले तसेच राज्यस्तरावर प्रेझेन्टेशन साठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उप-प्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी सर्व विजेत्यांचे कौतुक केले.