आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या 19 विद्यार्थ्यांची एस्सेल फ्रंटलाईनमध्ये निवड

0

शिरपूर। यथील आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या इलेक्टोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन व संगणक शाखेच्या 19 विद्यार्थ्यांची एस्सेल फ्रंटलाईन या बहुराष्ट्रीय आय.टी. सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीत नेटवर्क इंजिनिअर या पदावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली. सदर कंपनी तर्फे पटेल अभियांत्रिकीत पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन व संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेस्मेंटचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 140 विद्यार्थी या कॅम्पस प्रक्रियेत सहभागी झाले होते. त्यात एकूण 19 विद्यार्थ्यांची निवड झाली.

पटेल महाविद्यालयाचा स्तूत्य उपक्रम
जागतिक स्तरावर औद्योगिक क्षेत्रातवाढती मंदी व बेरोजगारी असतांना देखील पटेल अभियांत्रिकीच्या शै.वर्ष 2016-17 मध्ये एकूण 246 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय व नामांकित कंपनीत स्तुत्य निवड झाली आहे. यापैकी ई. टी. सी. शाखेच्या 71 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. येणार्‍या काळात अजून काही कंपनींच्या होणार्‍या कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत ई. टी. सी. शाखेच्या विद्यर्थ्यांची निवड संख्या 100 हून अधिक वाढण्याचे संकेत असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन व समन्वयक प्रा. सागर मोरे यांनी दिली.

या विद्यार्थ्यांची झाली निवड
एस्सेल फ्रंटलाईनद्वारे घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेटमध्ये इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेषन शाखेतील भूषण अलोणे, भूषण धामणे , पंकज चौधरी , कपिल देसले , विशाल देशमुख, योगेश कुवर ,कार्तिक महाजन , गोकुळ माळी , निखील वाघ , अजिंक्य चौधरी , मयूर महाजन , हर्षद पाटील, मिलिंद बोढरे , मयूर लालगे, दिपक माळी, कुलदीप सोमवंशी , जयेश महाजन आणि गौरव सिसोदिया तसेच संगणक शाखेतील अजय कोठारी या 19 विद्यार्थ्यांची नेटवर्क इंजिनिअर म्हणून निवड करण्यात आली आहे.

यांनी केले अभिनंदन
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन,विभाग प्रमुख प्रा.सुहास शुक्ल, प्रा. नितीन पाटील, प्रा. निलेश साळुंखे, प्रा. डी.एस. लाल प्रा. डी.आर. पाटील, प्रा. व्ही.एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रशांत महाजन, प्रा.सागर मोरे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.