शिरपूर। शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित तीन माध्यमिक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन त्यांनी महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. याबद्दल शासनातर्फे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते आदिवासी गौरवदिनी पुणे येथे बालगंधर्व नाट्य मंदिरात आयोजित सोहळ्यात चारही विद्यार्थ्यांना भरघोस रकमेसह पारितोषिक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. याबद्दल संस्थेच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्यमंत्री अंबरीश राजे आत्राम, आदिवासी विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, आदिवासी नासिक विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
आदिवासी विभागातील आश्रमशाळा
पूनम पावराला 80 हजार रूपयांचे बक्षिस, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच शिरपूर येथील आश्रमशाळेतील आकाश आंग्रेज्या पावरा याने 91.80 टक्के गुण व निमझरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थी निलेश मोहन पावरा याने 91.80 टक्के गुण मिळवून आदिवासी विकास विभागातून राज्यात मुलांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना उपस्थित मंत्री महोदयांच्या हस्ते प्रत्येकी 60 हजार रूपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
वाघाडी आश्रमशाळेचा विद्यार्थी
पुणे येथून आल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांचा व पालकांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, गोपाल भंडारी, सीईओ डॉ.उमेश शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावीच्या मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत वाघाडी येथील आश्रमशाळेतील पूनम सुनिल पावरा या विद्यार्थिनीने 90.40 टक्के गुण प्राप्त करुन आदिवासी विकास विभागातून मुलींमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यांची होती उपस्थिती
वाघाडी आश्रमशाळेतील विद्यार्थी मुकेश मोहन पावरा याने 91.40 टकके गुण मिळवून राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याला 45 हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, भुपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, राजाराम हळपे, डी.सी.येशी, गोपालभाऊ भंडारी, शैलेंद्र अग्रवाल, डॉ. उमेश शर्मा, अशोक कलाल, मुख्याध्यापक एच.के.कोळी, मुख्याध्यापक पी.डी.पावरा, मुख्याध्यापक ए.पी.ठाकरे, मुख्याध्यापक बी.एम.माळी, बी.डी.शिरसाठ, इंजिनिअर शिरसाठ, राजेंद्र सोनार, सुनिल जैन, नवल वंजारी त्यांचे पालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.