शिरपूर । येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सभापती रंजना सोनवणे, नगरसेविका संगीता देवरे, आशा बागुल, मुख्यकार्यकारी अधीकारी डॉ. उमेश शर्मा, रत्नप्रभा सोनार, नगरसेवक हर्षल गिरासे,साधन व्यक्ती मनोहर वाघ,अतुल पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, प्राचार्य पी.व्ही.पाटील, गणेश साळुंके, महेंद्र परदेशी बी.एम.माळी, मनोज पाटील, गोपाल पाटील, बी.बी.सोनवणे, रवींद्र खोंडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते.
पालकांचा उत्तम प्रतिसाद
बाल आंनद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी दीडशे विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावलेले होते. विद्यार्थ्यांना बालवयात आर्थिक व्यवहाराची समज यावी तसेच व्यवहारी ज्ञान व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शाळा दरवर्षी असे उपक्रम राबवित असते. सदर उपक्रमाला पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्वच्छता सर्वेक्षण 2018 अंतर्गत विद्यार्थ्यांनी पथनाट्य व स्वच्छता गीत सादर करून पालकांना स्वच्छता संदेश देण्यात आला.
ओला-सुका कचराबाबत जनजागृती
स्वच्छता सर्वेक्षण 2018 नुसार पथनाट्याव्दारे स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्यात केली. ओला कचरा,सुका कचरा याबाबत जनजागृती करण्यात आली. घर व परिसरात स्वच्छता करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या बाल मेळाव्यात विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळावे ही संकल्पना घेऊन त्यांनी विविध खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल लावून देण्यात आले होते. विद्याथ्यांनी यावेळी भूमिका साकारली होती.
यांनी पाहिले कामकाज
सूत्रसंचालन जगदीश सोलंकी यांनी केले. आभार प्रकाश ईशी यांनी मानले.उपशिक्षका रेखा माळी,मोहिनी सोनवणे,बबिता काटोले,स्मिता साळुंखे, वंदना सोनवणे, शुभांगी बाविस्कर, संगीता चव्हाण, अर्चना जोशी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महेंद्र माळी,गजेंद्र जाधव,संदीप चौधरी, गोपाल न्हावी,अविनाश राजपूत, रमेश शिरसाठ, जगदीश धनगर, योगेश बागुल यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी देखील कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.