शिरपूर । शिरपूर येथील आर.सी.पटेल इंग्लिश मेडीयम प्री-प्रायमरी ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शिरपूर पिपल्स बँकेचे माजी व्हा.चेअरमन कमलकिशोर भंडारी, न.पा. बांधकाम सभापती संगिता देवरे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, नगरसेविका मोनिका शेटे, स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्युली थॉमस, मुख्याध्यापिका एलिझबेथ, मुख्याध्यापिका स्मिता पंचभाई, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
गीतगायन, नृत्यांनी आणली बहार
उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. आर.सी.पटेल इंग्लिश मेडीयम प्री-प्रायमरी स्कूलच्या सिनिअर के.जी. च्या 9 तुकडयांमधील विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन डे सोहळयात नुकताच प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात सिनिअर के.जी. च्या अनेक विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल व शिक्षिकांबद्दल खूपच चांगले अनुभव कथन केले. काही विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी सुंदर अशी गीते गावून दाखविली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी कौतुक केले. मुख्याध्यपिका ज्युली थॉमस यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करुन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपाली भामरे मॅडम व कंचन मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.