शिरपूर। आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यर्थ्यांचा आत्मविश्वास व मानोबल वाढविण्याकरिता महाविद्यालयातर्फे एक प्रेरणादायी कार्यक्रम सेल्फी विथ सकक्सेस या नावाने व्यक्तीमत्व विकासावर कार्यशाळा आयोजित करण्यात आले असून त्यांचे उद्घाटन सतिश मंडोरा, प्राचार्य डॉ. संजय सुराणा व उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर उपस्थित होते. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.आ. अमरीशभाई पटेल, कार्यध्यक्ष तथा सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उप-प्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी अनमोल मार्गदर्शन केले.
रौप्यमोहत्सव साजरा : प्राचार्य डॉ. सुराणा यांनी प्रमुख पाहुणे सतिश मंडोरा यांचे स्वागत केले. तसेच महाविद्यालयाची माहिती दिली. महाविद्यालयाची सुरवात 1992 मध्ये झाली असुन 2017 मध्ये 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. तर 2017 हे रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. एका छोटया इमारतीपासून सुरु झालेले महाविद्यालय आज प्रशस्त इमारतीत रुपांतरीत झाले असून, महाविद्यालयास एन.बी.ए., नँक, यु.जी.सी. अश्या विविध समितीच्या मान्याता प्राप्त आहे. प्रथम वर्षाच्या विद्याथ्यार्ंसाठी व्यावसायिक शिक्षणाबरोबर व्यकतीमत्व विकास संभाषण कौशल्य विकसित करुन सर्वांगिण विकास व्हावा या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य सुराणा यांनी मार्गदर्शनअंतर्गत महत्वाकांशा असल्याशिवाय माणूस मेहेनत घेत नाही. मेहेनत घेतल्याशिवाय महत्वाकांशा पूर्ण होत नाही असे प्रतिपादन केले. उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी मुलांचा आत्मविश्वास वाढावा, असा कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
उदाहरणाद्वारे दिली ओळख
सतीश मंडोरा यांनी ग्रामीण भागातील मुलांमध्ये इंग्लिशची भीती आत्मविश्वासाची कमतरता, यामुळे न्यूनगंड निर्माण होतो असे सांगितले. तेव्हा त्यांना समुपदेशनाची गरज भासते म्हणूनच सकारात्मक विचार, स्वताची जाणीव, स्वतःची कौशल्ये आणि आनंद या सर्वांची छोट्या उदाहरणातून ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ योगिता अग्रवाल यांनी केले. डॉ. गोरले, डॉ. पंकज डांगरे प्रा. सी. व्ही. परदेशी. प्रा. कमलेश माळी प्रा. स्वाती रायसिंग आणि रजिस्ट्रार जितेश जाधव यांचे सहकार्य लाभले.