शिरपूर । येथील आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयात इंस्ट्रुमेंटेशन अँड अँप्लिकेशन ऑफ एच.पी.टी.एल.सी. इन ड्रग अनालिसिस या विषयावर एक दिवसीय परिसंवाद कार्यशाळा आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालय व एनक्रोम एन्टरप्राइजेस लीमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे योगेश भंडारी तर मार्गदर्शक म्हणून एनक्रोम एन्टरप्राइजेस लीमिटेड या कंपनीचे डायरेक्टर इनचार्ज बिजिनेस डील अक्षय चारगावकर, सिनियर ऍडव्हायझर टेकनिकल शाहरुख भरुचा, सिनियर सेल इंजीनियर अक्षय सिंग, आर.सी.पटेलचे प्राचार्य डॉ.एस.जे.सुराणा, उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर, एच.आर.पटेल, डॉ. संजय बारी आदी उपस्थित होते. डॉ.सुराणा यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यशाळेचे संयोजक डॉ. शिरखेडकर यांनी उद्दिष्टे व रूपरेषा मांडली.
एच.पी.टी.एल.सी. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संशोधन क्षेत्रातील उपयोग व विद्यार्थ्यांना त्याची संपूर्ण माहिती मिळावी हा हेतू कार्यशाळा घेण्यामागे असल्याचे सांगितले. चारगावकर यांनी एच.पी.टी.एल.सी.चे सखोल ज्ञान दिले यात एच.पी.टी.एल.सी. म्हणजे काय त्याची तत्वे कार्यप्रणाली आणि उपयोग याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. दुसर्या सत्रात भरुचा यांनी रेग्युलेटरी असापेकट व यूएसपी 203 चाप्टर (आयडेंटीफिकेशन ऑफ बॉटनिकल कान्स्टिट्युएंट फॉर यूएसए ) अर्थात वनस्पती घटकांची ओळख यूएसए कोणत्या प्रकारे केले जाते याबद्दल सविस्तर माहिती दिली.तिसर्या सत्रात कार्यशाळेअंतर्गत विद्यार्थाना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अक्षय चारगावकर यांनी इनेंस्टुमेंट चालू कसे करावे यापासून त्यातील पध्दत, तंत्रज्ञान, कार्यप्रणाली, सॅम्पल अँप्लिकेशन व एनालिसिस या सर्वांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या एक दिवसीय परिसंवाद व कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ सी.आर.पाटील, डॉ. ए.यु.टाटीया, डॉ.एच.एस.महाजन, डॉ.एस.एस. चालींकवर, डॉ.एन.जी.हसवानी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचे रजिस्ट्रार जितेश जाधव यांचे कार्यशाळेस सहकार्य लाभले. उद्घाटन प्रसंगी प्रा.हेमाक्षी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.पी.व्ही.जोशी यांनी आभार मानले मानले. संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिश पटेल, कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर यांनी परिसंवादाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले आहे.