शिरपूर । तालुक्यातील बभळाज येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयात तरडी केंद्रातंर्गत सन 2017-18 शिक्षण परिषद पार पडली. यावेळी पं.स.चे शिक्षण विस्तार अधिकारी पी.एस.गवळी हे अध्यक्षस्थानी होत तर तरडी केंद्राचे केंद्रप्रमुख वाय.आर.लोहार, होळनांथे केंद्राचे केंद्रप्रमुख एम.बी. देवरे, आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एन.पवार व सुमारे 100 शिक्षक वर्ग यांची उपस्थिती होती.
काही विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग
सुरवातीस कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचा पूजनाने झाली. आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एन.पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी काही विद्यार्थीनींनी कृतीयुक्त सहभाग घेतला. आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक ए.एम.सोनवणे यांनी संगणकाव्दारे गणित या विषयाचा एक आदर्श पाठ घेतला. पं.स.चे अधिकारी वर्ग यांनी आर्थिक ताळेबंद व इतर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एल.जाधव व आभार प्रदर्शन आर.एम.मोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.