आर.सी.पटेल विद्यालयात बालसभा यशस्वी

0

शिरपूर । आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय येथे महात्मा ज्योतीबा फुले पुण्यातिथी निमित्त बालसभा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची संपूर्ण रुपरेषा विद्यार्थ्यांनी हाताळली. कार्यक्रमास शाळेतील वरिष्ठ शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, सुत्रसंचालन, मनोगत, आभारप्रदर्शन आदी सर्व बाबी विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या केल्या.

पुस्तक प्रदर्शन
प्रतिमापूजनानंतर विद्यार्थ्यांनी महात्मा फुले तसेच बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच महात्मा फुले पुण्यतिथीचे औच्युत्य साधुन विद्यार्थ्यांनी वर्गात विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवले. त्यानंतर प्रमुख पाहूणे एस.सी.शिंपी, एन.डी.चव्हाण, आर.यु.चौधरी, एम.जी.अहिरे, पी.व्ही.पाटील व पर्यवेक्षक के.आर.जोशी यांनी मार्गदर्शन केले.