शिरपूर । येथील आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालयातर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे, शिरपूर लायनेस क्लबच्या अध्यक्षा संध्या जैन, विद्यालयाचे प्राचार्य तथा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.व्ही.पाटील, पर्यवेक्षक के.आर.जोशी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोरे, शिवदास गांगुर्डे, कल्पना पाटील, पालक शिक्षक कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. पाचवी ते दहावी पर्यंतच्या एकूण 60 विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले.
विविध उपक्रमांविषयी माहिती
प्रास्ताविकात प्राचार्य पी.व्ही.पाटील यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल तसेच शाळेतील विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. शाळेची गुणवत्तेची उज्ज्व्ल परंपरा कायम असल्याचे सांगून अनेक विद्यार्थी उच्च पदांवर असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. अध्यक्ष पी.झेड.रणदिवे यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन एस.सी.शिंपी यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.