आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या गुणवंतांचा सत्कार

0

शिरपूर । येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलातील 21 शाळांमधून तब्ब्ल 234 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या तसेच आयआयटी मध्ये आर.सी.पटेल इंग्लिश मेडिअम ज्युनिअर कॉलेजचा कुणाल प्रल्हाद मगरे याने एस.सी. प्रवर्गात 2163 व प्राची मनोज अग्रवाल हिने शारीरिक विकलांग प्रवर्गात 318 व्या क्रमांकाने निवड झाल्याने त्यांचा सत्कार व प्रत्येक शाळेतील प्रथम पाच विद्यार्थी अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जनक विला या आमदार कार्यालय येथे रविवार 18 जून रोजी करण्यात आला.संस्थेच्या 21 शाळांपैकी 17 शाळांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. संस्थेच्या 1655 पैकी 1651 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेचा निकाल 99.76 टक्के लागला. 1279 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 344 प्रथम श्रेणीत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. पियूष सतिष महाजन या पिद्यार्थ्याने 99.20 टक्के गुणमिळवूनशिरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

माजी मंत्री आ.पटेल यांची प्रमुख उपस्थिती
सत्कार सोहळयाप्रसंगी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा प्रसंगी संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, नगरसेविका नाजेराबी शेख, राजू शेख, प्राचार्य पी.व्ही.पाटील, प्राचार्या सौ. एम. एस. अग्रवाल, प्राचार्य रवि बेलाडकर, प्राचार्य एस. बी. पवार, प्राचार्य आर.बी.भदाणे, प्राचार्य आर.एन.पवार, प्राचार्य व्ही. आर. सुतार, प्राचार्य आर.एफ.शिरसाठ, प्राचार्य एन.सी.पवार,प्राचार्य व्ही.पी.दिक्षित, प्राचार्य एस.जी.वाणी, प्राचार्या सिमा मोरे, प्राचार्या सौ. एन.पी.देवरे, प्राचार्य एच.के.कोळी,प्राचार्य ए.पी.ठाकरे,प्राचार्य पी.डी.पावरा,प्राचार्य आर.बी.पाटील, प्राचार्य मुबिनोद्दीन शेख, प्राचार्य एस.आर.पाटील, प्राचार्य पी.एन.गोसावी, आयआयटी ब्रांच को-ऑर्डीनेटर संगिनी अपरांती, किशोर माळी, रविंद्र खुटे, अमित परदेशी, नितीन राजपूत, सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी तसेच आई वडील मोठ्या संख्येने उपस्थित होते.