शिरपूर । सोमवारचा दिवस शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील खेळाडूंसाठी भाग्याचा व सोन्याचा दिवस ठरला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता या सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील तसेच शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या पाच खेळाडूंची व मुंबई येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेच्या चार खेळाडूंची सिंगापूर येथे होणार्या 21 किमी अंतर धावणे मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली असून संस्थेच्या खर्चाने या खेळाडूंना खेळण्याचा बहुमान प्राप्त झाला असून हे सर्व खेळाडू 30 नोव्हेंबर रोजी सिंगापूरसाठी रवाना होत आहेत.
मुंबई हाफ मॅरेथॉन स्पर्धेंत सहभाग
आय.डी.बी.आय. फेडरल लाईफ इन्शुरन्स मुंबई हाफ मॅरेथॉन-2017 स्पर्धा अंतर्गत 14 ते 25 वर्षे वयोगटात शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या अनेक खेळाडूंनी टॉपटेन मध्ये यशस्वीरीत्यास्थान प्राप्त केले होते. त्यांच्यातून नारायण पावरा, सोमनाथ पावरा, जगन पावरा, चेतना पटेल, अश्विनी चौधरी या पाच मुलामुलींची तसेच मुंबई श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेच्या मिहीर, शिवम त्यागी, श्रुती सरण, सिमरन शर्मा या चार खेळाडूंची देखील निवड झाली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचे माजी शिक्षणमंत्री तथा आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल,नवीन शेट्टी, प्रितेश पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, सर्वसंचालक, प्राचार्य, सर्व प्रशिक्षक, मनीषा पाटील, सर्व क्रीडाशिक्षक यांनी कौतुक केले आहे.