शिरपूर । शासनामार्फत सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी वर्गाची शिष्यवूत्ती ची परीक्षा मार्चमध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेत संस्थेत बर्याच शाखेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .आर सी पटेल बभळाज माध्यमिक विद्यालय येथील 23 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते .त्यात 13 विद्यार्थ्याचे शिष्यवूत्ती यादीत नाव प्रविष्ट झाले .सदर विद्यार्थ्यांचे नगराध्यक्षा जयश्री बेन पटेल संस्थेचे सी .ई .ओ. डॉ .उमेश शर्मा , पं .स .गट शिक्षणाधिकारी रणदिवे , विस्तार अधिकारी गायकवाड ,प्राचार्य आर एन पवार ,भूषण मोरे यांनी अभिनंदन केले .सदर विद्यार्थ्यांना राकेश मोरे, सचिन बोरसे ,अमोल सोनवणे, टी. डी .पावरा यांचे मार्गदर्शन लाभले.