आर.सी.पटेल संकुलात हजारो विद्यार्थ्यांनी केली योगासने

0

शिरपूर । येथील आर्ट ऑफ लिव्हींग व शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या भव्य मैदानावरील हिरवळीवर सकाळी 7 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्यासह संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी तसेच प्राचार्य व शिक्षकांनी विविध प्रकारचे योगासने सादर केले. आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या प्राथमिक, माध्यमिक व विविध शाखांच्या हजारो विद्यार्थ्यांमार्फत विविध प्रकारचे योगासने करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, कमलकिशोर भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, प्राचार्य एच.वाय.देवरे, प्राचार्य पी.व्ही.पाटील, प्राचार्या सौ.एम.एस.अग्रवाल, प्राचार्य रवि बेलाडकर, प्राचार्य निश्‍चल नायर, प्राचार्य नवीन हासवाणी, जे.एल.चौधरी, डॉ.के.बी.पाटील, डॉ.ए.ए.शिरखेडकर, मनोज बेहेरे, के.आर.जोशी, सी.डी.पाटील, पप्पू परदेशी, भोइ सर, गोपाल पाटील, दुष्यंत पाटील, सर्व क्रीडा शिक्षक, रविंद्र खुटे, नितीन राजपूत, सर्व कर्मचारी उपस्थित होते.