आलियाचा शाहीनला एक इमोशनल मेसेज

0

मुंबई : बॉलीवूडची व्हरसटाइल अभिनेत्री आलिया भट्टने आपली बहिण शाहीनसाठी एक व्हिडिओ पोस्ट केले आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हे व्हिडिओ पोस्ट करुन शाहीनला एक इमोशनल मेसेज दिला आहे.

आलिया शाहीनच्या खूप जवळ आहे. काही दिवसांपूर्वी शाहीन डिप्रेशनमध्ये गेली होती. शाहीन यातून बाहेर कशी आली याचा अनुभव आलियाने या प्रेरणादायक व्हिडिओत दाखवला आहे.एका व्हिडिओत आलियाने शाहीनची क्षमा मागितली आहे. शाहीन लहानपणी नेहमी आनंदी असायची. काही ठिकाणी आलिया भावूक होऊन शाहीनला एक पत्र लिहिताना दिसून येत आहे.