आलियाने केले रणबीरचे कौतुक; ‘संजू’ सर्वाधिक आवडता चित्रपट

0

मुंबई – आलिया भट सध्या तिच्या आगामी सिनेमांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तिच्या आणि रणबीर कपूरच्या रिलेशनशिपबद्दल उलट-सुलट चर्चा सध्या सुरू आहे. अशातच आलियाने ‘संजू’ सिनेमातील रणबीर कपूरच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. ‘संजू’ सिनेमा मला मनापासून आवडला. हा विलक्षण उत्कृष्ट सिनेमा आहे. माझ्या बेस्ट १० सिनेमांमध्ये संजू सर्वात वरच्या स्थानावर आहे.

विकी कौशल आणि परेश रावल यांनीही उत्कृष्ट काम केले आहे. अनुष्का आणि सोनम कपूर यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे , असे आलियाने म्हटले आहे. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाबद्दल बोलताना आलिया म्हणाली, मी राजकुमार हिरानी यांची मोठी फॅन आहे. जेव्हा जेव्हा त्यांचा सिनेमा येणार असतो तेव्हा तो पाहण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही. मागच्या काही दिवसात होऊन गेलेल्या चांगल्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. सध्या ब्रम्हास्त्र तसेच कलंक या सिनेमांच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याचेही आलिया म्हणाली.

झोया अख्तरच्या ‘गल्ली बॉय’ या सिनेमात आलिया रणवीर सिंग सोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. तर, ‘कलंक’मध्ये ती वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत आहे. आयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’मध्ये तिची केमिस्ट्री रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.