न्यूयॉर्क : 18 व्या आयफा पुरस्कार 2017 चे रंगारंग आयोजन न्यूयॉर्कमधल मेटलाइफ स्टेडियममध्ये करण्यात आले होते. सलमान खान, आलिया भट्ट, शाहिद कपूर, नेहा धूपियासह अनेक कलाकार या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.
शाहिद कपूरला उडता पंजाब चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. तर, अलिया भट्टला उत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार देण्यात आला. सोनम कपूरच्या नीरजा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात आले. तसेच पिंक चित्रपटाचे दिग्दर्शक अनिरूध्द रॉय चौधरी यांना उकृष्ट दिग्दर्शकाचा आयफा पुरस्कार देण्यात आला.