मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा ट्रेंड सुरु आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्या रिलेशनशीपला एक पाऊल पुढे घेऊन जाऊ इच्छित आहे. त्यामुळे हा कपल पुढच्या वर्षी लग्न करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांना डेट करत आहे. दोघांच्या कुटुंबीयांदेखील त्यांच्या नात्याला मंजुरी दिली आहे.
रिपोर्टनुसार फक्त रणबीर नाही तर संपूर्ण कपूर कुटुंबीयांना आलिया पसंत आहे. तसे पाहिला गेले तर कपूर कुटुंबीयांमध्ये लग्नानंतर मुलींना काम करायला परवानगी नाही मात्र आलिया याला अपवाद आहे. दोघांचे एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. महत्त्वाचे म्हणजे आलियाच्या फोटोंवर नीतू कपूर नेहमीच पसंती आणि दाद देताना दिसतात.