आळंदी : येथील प्रदक्षिणा मार्गा वरील व्यापारी संकुल क्रमांक 2 समोर टेम्पो व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. राजू दलसरे राजपूत (रा.भोसरी) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो (एम.एच 04 डी.के.3064) चालकाला अटक केली आहे. टेम्पो मरकळ चौकातून पुण्याकडे जाताना अपघात झाला. टेम्पाची मोटारसायकलला मागून धडक दिली. यात राजपूत यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. तात्काळ त्यांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.