250 पास देण्याचा पोलीस सूत्रांचा आग्रह
आळंदीः माऊलींचे पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी मंदिरात प्रवेश देण्यासाठी खांदेकरी यांना पास देण्यात येणार आहेत. मात्र यावर्षी पासची संख्या 250 पर्यंत नियंत्रित रहाणार आहे. यासाठी पोलीस सूत्रांनी मर्यादा आणली आहे. माऊली देवस्थान प्रवेशाचे पास देण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला. पोलिसांनी पास देण्यास नागरिकांचा विरोध होता. अखेर देवस्थानाने पास देण्यास संमती दिली. यावर्षी श्रींचे पालखी सोहळ्यात खांदेकर्यासाठी पांढर्या रंगाचा पोशाख वापरणेे बंधनकारक ठेवण्याचा निर्णय आळंदी पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांचे उपस्थितीत आळंदीत पोलीस मित्र आणि आळंदी ग्रामस्थ, पदाधिकारी यांची बैठक झाली. यास प्रभारी दत्तात्रय दराडे, मुख्याधिकारी समीर भूमकर, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, नगरसेवक प्रकाश कुर्हाडे, प्रशांत कुर्हाडे, सचिन गिलबिले, आदित्य घुंडरे, सुरेश घुंडरे, संदीप नाईकरे उपस्थित होते.
नागरिकांचा विरोध कायम
मंदिरातील जागेचा विचार करून खांदेकरी यांचे प्रवेश करण्याचे संख्येवर टाच आणण्यात आली. मात्र दिंड्यांमधील वाढती वारकरी यांची संख्या रोखण्यास उपाय योजनेकडे मात्र दुर्लक्ष झाले. आळंदी ग्रामस्थ आणि पोलीस यांचेत पास वाटपावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. पोलिसांकडून पास वाटपास नागरिकांचा विरोध कायम राहिला. अखेर आळंदी देवस्थांकडून पास वाटपाच्या निर्णयावर एकमत झाले.मात्र 250 पेक्षा जास्त पास आढळल्यास याचा जाब द्यावा लागेल अशी भूमिका यावेळी उघड झाली. खांदेकरी पाससाठी ग्रामस्थांनी आधार कार्ड आणि दोन छायाचित्र देण्यास आग्रह धरण्यात आला आहे. पाढंरा सफेद पोशाख, पांढरी टोपी असणे आवश्यक रहाणार आहे. पालखी सोहळा वैभवी असल्याने यात वाढ करण्यास सर्वांनी मिळून सहकार्य करण्याचे यावेळी बैठकीत ठरल्याने सोहळा प्रस्थान मोठ्या दिमाखात आणि शिस्तबद्ध होणार आहे.