चंदनउटी माऊलींचे दर्शनास भाविकांची गर्दी
आळंदी:- माउली मंदिरात चंदन उटीचा वापर करून श्री’चे शिंदेशाही पगडी अवतारातील वैभवी रूप नेत्रांत साठविण्यासह श्रींचे दर्शन घेण्यास आळंदीत परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली. परिसरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.
संजीवन समाधीवर चंदनउटी
चैत्रातील पाडव्यापासून माऊलींचे समाधीवर चंदन लावले जाते. रामनवमी निमित्त माऊलींचे समाधीवर अभिजित धोंडफळे यांनी श्रींचे वैभवी रूपातील शिंदेशाही अवतारातील रूप साकारले. संजीवन समाधीवर चंदन उटीसह वस्त्रालंकार, पुष्पसजावट करण्यात आली.यावेळी प्रमुख विश्वस्त डॉ अभय टिळक आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते. मानकरी संतोष मोझे यांचे वतीने गजानन महाराज लाहुडकर यांचे कीर्तन झाले. घंटानाद,काकडा,पवमान अभिषेक, दुधारती,गुढी पूजन उत्साहात झाले.
आमजन्मोत्सव व विविध कार्यक्रम
माउली संजीवन समाधीवर चंदन उटी तील शिंदेशाही पगडीतील वैभवी रूप साकारत पूजा करण्यात आली. मानकरी यांना संस्थानाच्या वतीने नारळ प्रसाद दीला. राम मंदिराच्या वतीने श्रीरामाची पालखी मंदिर प्रदक्षिणा आणि नगर प्रदक्षिणा करण्यास आली. अमरज्योत मित्र मंडळाच्या वतीने कुर्हाडे गल्लीत रामजन्मोत्सव व विविध कार्यक्रम झाले. स्वामी महाराज मठात श्रींचे संजीवन समाधीवर चंदन उटी तून श्री’चे शिंदेशाही पगडी तील वैभवी रूप क्षेत्रोपाध्ये पुजारी गांधी परिवाराने साकारले.