आळंदी : आळंदी शहर शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत सार्वजनिक वृत्तपत्र मोफत वाचनालय सुरू करून त्याचे लोकार्पण उत्साहात करण्यात आले. या वाचनालयाचे लोकार्पण पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी गावडे म्हणाले की, आळंदी परिसरातील वाचन संस्कृती वाढीसाठीची गरज ओळखून शहर शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून या वाचनालयाची सुरुवात केली आहे. वाचाल तर वाचाल या लोक भावनेतून सुरू झालेल्या उपक्रमाचा लाभ वारकरी, भाविक, नागरिकांनी नियमित घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी विभाग प्रमुख सुरेश झोंबाडे, माजी नगराध्यक्ष तथा शहर प्रमुख रोहिदास तापकीर, महिला आघाडी आळंदी शहर प्रमुख मंगला हुंडारे, माजी नगरसेवक रमेश गोगावले, उत्तम गोगावले, अविनाश तापकीर, अशोक लोढा, अमोल वीरकर, संजय तापकीर, उपशहर प्रमुख संदीप पगडे, प्रवीण जंगले, नीलेश मोजाड, संदीप कायस्थ, माउली घुंडरे, राम पांचाळ, महिला आघाडीच्या संगीत फफाळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपरिषद व्यापारी संकुल, जुने एस.टी.बस स्थानक परिसरातील नागरिक, भाविकांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या या उपक्रमाचे स्वागत केले.