आळंदीत साडेनऊ हजार मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

0

आळंदी : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जंतनाशक मोहिमेनिमित्त आळंदी परिसरातील शाळांमध्ये सुमारे साडेनऊ हजार विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 1 ते 19 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना या गोळ्या देण्यात आल्या. येथील श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय, दुराफे विद्यालय, आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक 1 ते 4 याठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते महादेव पाखरे यांचे हस्ते करण्यात आली.

या मोहिमेसाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. जी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, आळंदीतील इतर खाजगी इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्येदेखील या मोहिमेचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी ग्यानज्योत इंग्लिश स्कूलच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांनी केली आहे.