आळंदी : रक्तदान श्रेष्ठ दान हा संदेश देत आळंदीत तरुणांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 104 नागरिकांनी रक्तदान करून स्वातंत्र्यदिन साजरा केला.
आळंदी परिसरात सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत स्वराज ग्रुप तर्फे गेल्या 9 वर्षांपासून 15 ऑगस्टच्या दिवशी सामाजिक उपक्रमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. पुणे येथील के.ई.एम. हाँस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उदघाटन प्रसंगी खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकुर, आळंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी नंदकुमार गायकवाड , आळंदीच्या नगराध्यक्षा वैंजयता उमरगेकर उपस्थित होते.
सर्व 104 रक्तदात्यांना स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत भेटवस्तू देण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रकाश कुर्हाडे, तुषार धुंडरे, आदित्य धुंडरे, प्रशांत कुर्हाडे, नगरसेविका प्रतिभा गोगावले, स्नेहल कुर्हाडे, पारूबाई तापकीर, सविता गावडे, मिराताई पाचुंदे, शैला तापकीर, प्रमिला रहाणे, माजी नगरसेवक रमेश गोगावले, रामदास भोसले, स्वराज ग्रुपचे अध्यक्ष आशिष गोगावले, अमित डफळ, राज पवळे, संकेत वाघमारे, सागर कारेकर आदींसह पदाधिकारी उपस्थितीत होते. के.ई.एम.हाँस्पिटलचे डाँ.किशोर धुमाळ, डॉ.यदुनाथ टेलकीकर व रक्तपेढीच्या सहकार्यांनी काम पाहिले.