सुवर्णकार समाज धर्मशाळेत पार पडणार
आळंदी : अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार समाज प्रांतिक मंडळ, आळंदी देशस्थ दैवज्ञ सोनार समाज, पुणे मंडळ व श्री संत नरहरी सेवा संघ पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने दहावे पंचवार्षिक राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशन आयोजित केले आहे. आळंदी येथील देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज धर्मशाळा येथे शनिवार दि. 12 व रविवार दि. 13 जानेवारीला हे अधिवेशन होणार आहे. तसेच मालती व अरविंद शंकरराव खोल्लम भक्त निवासचे उद्घाटन होणार आहे. शनिवारी दि. 12 जानेवारीला पाटस येथील सुमन घोडेकर व वंदना घोडेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी लक्ष्मण फाकटकर असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून चिमण खोल्लम, सर्व संस्थाचे अध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहे.
हे देखील वाचा
सोनार व्यवसायावर समारोप सत्र
सकाळच्या सत्रामध्ये रमेश वाळुंज हे सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर बोलणार असून अध्यक्षसथानी उर्मिला वेल्हेकर असणार आहेत. तर अनिल वाघाटकर यांचे सोनार व्यवसायावर व संगीता निघोजकर यांचे स्त्री शक्ती सबलीकरण तर दुपारच्या सत्रामध्ये अमित कापाळे यांचे ताण-तणावाचे व्यवस्थापन, स्वप्नील खोल्लम यांचे स्पर्धा परीक्षा व डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांचे तरुणाई सहभाग आणि विकास याविषयावर मार्गदर्शऩ करणार आहेत. रविवारी दि. 13 जानेवारीला महिला सत्रांमध्ये सकाळी अॅड.अपर्णा रामतीर्थकर यांचे कुटुंब व्यवस्था यावर बोलणार आहेत. रविवारी दि. 13 जानेवारीला दुपारी एक वाजता प्रा. नितीन फाकटकर यांचे रोख-ठोक संवाद यावर बोलणार आहेत. दुपारी तीन वाजता सोनार व्यवसाय यावर समारोप सत्र होईल.