भाविकांची होत आहे आर्थिक पिळवणूक; पुजार्यांकडून होते लूट
सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी दिले आदेश
आळंदी : आळंदी देवस्थाना बाहेरील दुकानांमध्ये होणारी भाविकांवी मोठी आर्थिक पिळवणूक होत असते. देवस्थान मंदीराकडून चप्पल स्टँड, पिण्याचे पाणी मोफत पुरविणे हे देवस्थानचे काम आहे. मात्र मंदिराबाहेरील चप्पल स्टँडवर पैसे आकारले जातात, त्याबद्दल कोणतीही पावती दिली जात नाही. मंदिरात गर्दीच्या नावाखाली अक्षरशः भाविकांना ढकलले जाते. 2 मिनिटेही डोके ठेवू देत नाही. नियमानुसार येथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थळात पूजा करण्यासाठी 320 रुपये फी देवस्थानकडे भरणे आवश्यक आहे. पण येथील पुजारीच भाविक ांकडून परस्पर पैसे घेऊन देवस्थानास केवळ 20 रुपये देत आणि स्वतःकडे 300 रुपये ठेवत असत. या सर्व बाबींकडे विश्वस्तांचे क ोणतेही लक्ष नसल्याचे आढळून आले. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर मंदिराचे व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या ‘संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’च्या व्यवस्थापनावर पुणे सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी ‘कलम 41 डी’ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
विश्वस्तांनाही नोटीस बजावणार
धर्मादाय आयुक्तांकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये भाविकांबरोबर होत असलेल्या विविध गैरप्रकारांबाबत माहिती समोर आली आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली देवस्थान मंदिरात देवस्थानच्या चोपदारांची भाविकांवर दमदाटी करीत असतात. भाविकांची होणारी आ र्थिक पिळवणूक, पुजार्यांकडून भाविकांची होणारी लूट, देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण यासह अन्य तक्रारीमुळे विश्वस्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यांची बाजू ऐकल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण आणि एकूणच व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यास विश्वस्तांना आलेले अपयश यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. भाविकांकडून आलेल्या तक्रारींनंतर धर्मादाय निरीक्षक कैलास महाले यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यानंतर केलेल्या नि रिक्षणानंतर यामध्ये जे आढळले त्याचा त्यांनी 50 य आयुक्त दिलीप देशमुख यांनी बुधवारी हे आदेश दिले. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माउलींचे देवस्थान जगप्रसिध्द आहे. आषाढी आणि कार्तिक वारीला तर येथे भाविकांची मांदियाळी जमते. त्यामुळे देवस्थानवर कारवाई क रण्यात येणार असल्याने खळबळ उडाली आहे.
चोपदार करतात हस्तक्षेप
माऊलींच्या दर्शनासाठी दररोज मोठी गर्दी जमत असते. देशाच्या विविध भागातून तसेच गावागावातून अनेक नागरिक येत असतात. या भाविकांना चप्पल स्टँड, पिण्याचे पाणी यांसह आदी सुविधा मोफत पुरविणे हे प्रत्येक देवस्थानचे कर्तव्य आहे. पण, मंदिराच्या बाहेरील चप्पल स्टँडवर पैसे आकारण्यात येत असून त्याची कोणतीही पावती दिली जात नाही. तसेच त्या कंत्राटदाराची मुदत संपली असून त्याचे नूतनीकरणही झालेले नाही, असे निरीक्षकांच्या अहवालात आढळून आले आहे. येथील चुकीच्या गोष्टीबाबत बर्याच वर्षार्ंपासून धर्मादाय क ार्यालयाकडे तक्रारी येत होत्या. त्यापैकी येथील चोपदारांची वाढलेली अरेरावी ही प्रमुख तक्रार होती. येथील चोपदार हे त्यांचा अधिकार नसलेल्या गोष्टीत हस्तक्षेप करणे, भाविकांकडून पैसे घेणे या तक्रारी होत्या. तसेच त्यांनी गेल्या वर्षी ‘चोपदार फाउंडेशन’ हे न्यास धर्मादाय कार्यालयात नोंद केले आहे. त्याच्याही कार्यपद्धतीची चौकशी करण्याचे आदेश धर्मादाय कार्यालयाने दिले आहेत.
दुकानांचे करारनामे संपले
देवस्थानची घटना 1852 सालची असून ती तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तयार केलेली आहे. त्यामध्ये देवस्थानच्या मालकीची 435 एकर जमीन असून त्यावर शाळा व इतर अतिक्रमण झालेले आहे. तसेच घाटावरील दुकाने यांचे करारनामे संपलेले आहेत. त्यांनी पोटभाडेकरूही ठेवले आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. येथील देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांच्याशी संपर्क के ला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.