आळंदी सुवर्णकार समाज संस्थेच्या अध्यक्षपदी संतोष खोल्लम

0

आळंदी : येथील दैवज्ञ देशस्थ सुवर्णकार समाज संस्थेच्या अध्यक्षपदी प्रतिष्ठीत व्यापारी संतोष खोल्लम यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. येथील समाज धर्मशाळेत समाज बांधवांच्या बैठकीत सर्वानुमते ही फेरनिवड जाहीर करण्यात आली. पुढील पाच वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीदेखील या सभेत जाहीर करण्यात आली. त्यात उपाध्यक्ष डी. एन. खोल्लम, सरचिटणीस शशी निघोजकर, शंकर बेल्हेकर, खजिनदार मच्छिंद्र खोल्लम, हिशोब तपासनीस विश्वस्तपदी मिलिंद फाकटकर, संतोष निघोजकर यांचा समावेश आहे.

नवनिर्वाचितांचे अभिनंदन
खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली. उल्लेखनीय काम करणार्‍या समाज बांधवांचा यावेळी विश्वस्त मंडळींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान, समाजाच्या धर्मशाळेचा सर्वांगीण विकास व भक्त निवासाचे बांधकाम पूर्ण केले जाईल. तसेच सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असा मनोदय अध्यक्ष संतोष खोल्लम यांनी व्यक्त केला. नव निर्वाचित अध्यक्ष व पदाधिकारी यांचे आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांनी अभिनंदन केले. उषा खोल्लम यांनी आभार मानले.