आवक वाढल्याने वांगी, काकडी, दुधीच्या दरामध्ये घट

0

पुणे । मागील आठवड्यात श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात आवक वाढल्याने दरात मोठी घट होऊन बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी कमी प्रमाणात माल विक्रीसाठी आणला होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी आवक वाढल्याने वांगी, काकडी आणि दुधीच्या दरात घट झाली आहे. आवक जावक कायम असल्याने इतर फळभाज्यांचे दर स्थिर राहिले असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

रविवारी गुलटेकडी यार्डात सुमारे 160 ते 170 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून बँगलोर येथून दोन टेम्पो आले. मध्यप्रदेश मधून 13 ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून तीन ते चार ट्रक कोबी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून 15 ते 16 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 7 ट्रक गाजर, मध्यप्रदेश आणि गुजरात मधून लसणाची अडीच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 1700 ते 1800, टोमॅटोची पाच ते साडे पाच हजार पेटी, हिरवी मिरचीची 3 ते 4 टेम्पो, फ्लॉवरची 18 ते 20 टेम्पो, कोबीची 18 ते 20 टेम्पो, ढोबळी मिरचीची 10 ते 12 टेम्पो, भुईमूग शेंगची 25 पोती, पावटा 7 ते 8 टेम्पो, वांगी 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळाची 8 ते 10 टेम्पो, गवारची 5 ते 6 टेम्पो, भेंडीची 8 ते 10 टेम्पो, कांद्याची 130 ते 140 ट्रक, आग्रा, इंदौर आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 60 ट्रक इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवा : 350-450, जुना : 400-520, बटाटा : 50-110, लसूण : 150-450, आले : सातारी : 160-180, बँगलोर : 220-240, भेंडी : 150-250, गवार : गावरान व सुरती 300-400, टोमॅटो : 280-350, दोडका : 200-300, हिरवी मिरची : 150-250, दुधी भोपळा : 40-100, चवळी : 200-250, काकडी : 50-100, कारली : हिरवी 250-300, पांढरी : 180-200, पापडी : 300-350, पडवळ : 180-200, फ्लॉवर : 40-80, कोबी : 140-200, वांगी : 60-100, डिंगरी : 180-200, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची :250-300, तोंडली : कळी 240-250, जाड : 100, शेवगा : 1100, गाजर : 250-300, वालवर : 250-300, बीट : 250-300, घेवडा : 400, कोहळा : 100-150, आर्वी : 200-250, घोसावळे : 140-150, ढेमसे : 180-200, पावटा : 300-350, भुईमुग शेंग : 350, मटार : 400-450, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 280-300, मका कणीस : 50-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

लग्नसराईमुळे शोभेच्या फुलांच्या दरात वाढ
जर्बेरा, कार्नेशियन, गुलाब, गुलछडी आदी फुलांच्या दरात लग्नसराईमुळे 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, मार्गशीर्ष महिन्यामुळे इतर फुलांनाही चांगली मागणी असून जिल्ह्याच्या विविध भागातून फुलांची आवक चांगली होत असल्याने दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली. मार्गशीर्ष महिन्यामुळे कोकणातून तर लग्नसराईमुळे शहराच्या विविध भागातून फुलांना मागणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.