आवड,परिश्रम आणि सातत्य यामुळे संगीत क्षेत्रात यशस्वी

0

जळगाव । तुझे तुणतुणे घ्यायला किती पैसे लागतील असे सांगत वडिलांनी 25 हजाराचा चेक दिला. ते तुणतुणे म्हणजे सिंथेसायझर खरेदी केले. एवढेच नाही तर वैद्यकीय शिक्षणास नंबर लागलेला असताना देखील ते सोडून संगीतक्षेत्रात समर्पितभावाने संगीत आराधना केली.परिश्रम आणि सातत्य यामुळे टिंग्या, ख्वाडा,आता रिंगणला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.त्यासोबत आपल्याकडील विद्यार्थ्यांनी स्मार्ट होण्यासाठी तंत्रज्ञान सतत हाताळले पाहिजे व स्वत:ला अद्ययावत ठेवले पाहिजे. असे आवाहन डॉ.अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयातील सेंटर फोर मास मिडिया आणि फोरेन लग्वेजेसतर्फे आयोजित एक सुरेल प्रवास कार्यक्रमात संगीतकार रोहित नागभिडे यांनी प्रतिपादन केले.

माझं आभाळ तुला घे…
यावेळी मंचावर प्राचार्य राणे,रामप्रकाश गुप्ता,एन.एस.पाटील,साई निंबाळकर,पियुष कुलकर्णी उपस्थित होते.यावेळी बोलताना पुढे म्हणाले कि ,ललित कला केंद्र पुणे इथे समीर नखाते यासोबत मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.कवी प्रकाश होळकर यांच्या माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला दे या कवितेला टिंग्या चित्रपटात संगीत दिले आणि ते गाणे सर्वाना आवडले.त्यानंतर चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि रोहित नागभिडे अशी ओळख झाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या साई निंबाळकर,पियुष कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.रोहित नागभिडे यांच्याकडे संगीत संयोजन आम्ही करतो.आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत एकत्रित काम करण्याची पद्धत दिसत नाही ती हिंदी चित्रपटसृष्टीत दिसते त्यामुळे तिथे संघर्ष कमी दिसतो आणि खूप चांगली कामे करता येतात.आणि साऊड यात झालेला बदल देखील आपण लक्षात घेतला पाहिजे.सैराट मध्ये वैश्विक संगीत भावले कारण त्याचा साऊड आणि तंत्रज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे.

रोहितचे संगीत दिलेले आगामी चित्रपट
रोहित नागभिडे यांच्या आगामी चित्रपटाविषयी त्यांनी सांगितले कि लूजकंट्रोल,भिरभिर,अधम,व फायटर हे चित्रपट येत आहेत. आतापर्यंत टपाल,बाबू बाजा,बोनी कपूर यांनी निर्मिती केलेला लालबागची राणी हे चित्रपट येऊन गेले आहेत. सुरक्षित अंतर ठेवा हे पुष्कर श्रोत्री अभिनित व प्रणीत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक येत आहे. ज्याला संगीत दिले आहे असे रोहित नागभिडे यांनी सांगितले.यावेळी प्राचार्य राणे यांनी मनोगत व आकर्षक शैलीने सूत्रसंचालन जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले.