लोणावळा : आपल्यातील क्षमता ओळखा. कोणत्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे, हे निश्चित करा. आपली आवड जोपासत; ज्या क्षेत्रात आपण उत्तुंग भरारी मारू शकतो, अशाच क्षेत्रात पुढे जा. आवडीच्या क्षेत्रात करियर केले तर, आपली आवड जोपासली जाईल आणि उत्पन्नाचे साधनही मिळेल, असा सल्ला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मावळातील विद्यार्थ्यांना दिला. शिवसेनेचे मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी व कै. शंकरराव मोरे यांच्या स्मरणार्थ लोणावळा शहर शिवसेना व कै. उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठान यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना रावते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश केदारी, मावळचे उप तालुकाप्रमुख सुरेश गायकवाड, माजी नगरसेविका सौम्या शेट्टी, प्रशांत शेट्टी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, संतोष गुप्ता, पुष्पलता अनसुलकर, शिलाताई खत्री, बबनराव अनसुलकर, बबन खरात, मुन्ना मोरे, जितेंद्र राऊत, सुनील इंगूळकर, संजय घोंगे, मारुती खोले, शंकर शिर्के, गणेश भोकरे, विशाल हुलावळे, सचिन वाळके आदी उपस्थित होते.
मुलांना आवडीनुसार क्षेत्र निवडू द्या
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आले आहे. तसेच शिक्षणाचे क्षेत्रही व्यापक झाले आहे. याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. भविष्य घडविण्याची एक उपजत शक्ती प्रत्येकाकडे असते. याकरिता मुलांच्या आवडीनुसार त्यांचे करियर निवडू द्यावे, असे आवाहन रावते यांनी उपस्थित पालकांना केले. आज देशात सुशिक्षित बेरोजगारी वाढली असल्याने रुळलेल्या वाटांनी न जाता तांत्रिक शिक्षणाची कास धरा, यशस्वी उद्योजक बना, असे आवाहनदेखील दिवाकर रावते यांनी विद्यार्थ्यांना केले. गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र खराडे यांनी केले तर जितेंद्र राऊत यांनी सूत्रसंचालन केले.
संयोजनात यांचा हातभार
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी कुलदीप लोहर, लक्ष्मण दाभाडे, दिनेश वीर, हेमंत मेणे, शिला खत्री, अक्का पवार, तावरे ताई, अनिता गोणते, नरेश घोलप, दिलीप गायकवाड, नरेश काळवीट, अजय ढम, ओंकार खराडे, भावेश खराडे, यशोधन शिंगरे, प्रसाद खोले, नीलेश कशाळे, शंकर जाधव, अनिल कालेकर, इंद्रजित तिवारी, सुनील येवले, बाळू लोहर, सुरेश गुप्ता, कैलास सगळे, नागेश चव्हाण, सुरेश गुप्ता, राजु शेलार, सुनील मोरे, अनिल ओव्हाळ, सुरेश टाकवे, दीपक हुंडारे, आशिष ठोंबरे, संतोष शिंदे, अंकूश सातकर, अनंता आंद्रे, ज्ञानदेव जांभुळकर, बबनराव अनसूरकर, राजू चव्हाण, राजू कंभार, शामबाबू वाल्मिकी आदींनी परिश्रम घेतले.