सुरतहून येत होता जळगावात ; जळगाव रेल्वेस्थानकाजवळील घटना
जळगाव : सुरत येथील खाजगी काम आटोपून जळगावकडे परतत असतांना रेल्वेतून पडल्याने विजय वेडू सपकाळे वय 30 रा. आव्हाणे या अपंग तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास समोर आली आहे. आव्हाने येथील ग्रामस्थांमुळे तरुणाची ओळख पटली यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
आव्हाणे येथून विजय सपकाळे हा गेल्या काही दिवसांपासून खाजगी कामानिमित्ताने सुरत येथे गेला होता. तेथून सोमवारी रेल्वेने परतत असताना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वेतून तोल जावून विजय हा खाली पडला. या रेल्वेखाली येथून त्याचा मृत्यू झाला. रेल्वे रुळावर त्याचा मृतेदह पडलेला होता. 11 वाजेच्या सुमारास आव्हाणे येथील ग्रामस्थ जात असतांना त्यांनी विजयला ओळखले व त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानुसार कुटुंबियांसह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. व पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी नातेवाईकांली एकच गर्दी केली होती.
वयाच्या 17 व्या वर्षापासून पायाने अपंग
विजयच्या पश्चात वडील वेडू श्रावण, आई सुमनबाई, भाऊ गणेश, वहिणी सविता, बहिणी लक्ष्मीबाई, दुर्गाबाई व दोन पुतणे असा परिवार आहे. बहिणी विवाहित असून त्या सासरी नांदत आहे. वडील व भाऊ दोन्ही हातमजुरी करुन उदरनिर्वाह भागवतात. विजयला वयाच्या 17 वर्षी प्रचंड ताप आला होता. या तापामुळे तो एका पायाने अपंग झाला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.