आव्हाण्यातील हाणामारी प्रकरणी 9 जणांना अटक

0

जळगाव । पूर्ववैमनस्यातून तसेच शेतात बकर्‍या चारायला नेल्याच्या कारणावरून रविवारी आव्हाने येथै दोन गटात तुंबळ हाणामारी होवून दगडफेक झाली होती. दरम्यान, या घटनेत दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले होते. तर तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही गटाने दिलेल्या फिर्यादीवरून परस्पर विरोधी दंगलीचा आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी 9 संशयितांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आव्हाने गावात दुसर्‍या दिवशीही तणावपूर्ण शांतता दिसून आली. आव्हाणे येथे सायंकाळी 6.30 वाजता दोन गटात हाणामारी होवून दगडफेक झाली होती. या दगडफेकीत दहा ते बारा जण जखमी झाले होते. तर रिक्षाचेही नुकसान झाले होते. पोलिसांचा ताफाचा ताफा घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही गटातील नागरिकांची पळापळ सुरू झाली. मात्र, शहरातून आलेल्या शंभर दुचाक्यांमुळे अजून गोंधळ वाढला.