आशा,गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार

0

जिल्हाधिकारी कार्यालयावर आयटकतर्फे मोर्चा

जळगाव-आशा,गटप्रवर्तकांना मानधन वाढीची अंमलबजावणी करावी,त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे आदी प्रलंबित मागण्यासाठी आयटकतर्फे जिल्हाधिकारी क ार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात जिल्हाभरातील आशा सेविका सहभागी झाल्या होत्या.दरम्यान,उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

या आहेत मागण्या
आशा सेविकांचे मानधन दोन हजारावरुन चार हजार करण्यात आले आहे.त्याची अंमलबजावणी आचारसंहितेपूर्वी करावी,आशा व गटप्रवर्तकांना कायम सेवेत सामावून घ्यावे,प्रवास भत्ता द्यावा,विमा,पेंशन लागू करावा आदी मागण्यांसाठी आयटकतर्फे आशा व गटप्रवर्तकांचा महात्मा गांधी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा क ाढण्यात आला.दरम्यान,उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.आयटकचे कॉ.अमृत महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात यांचा होता सहभाग
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात कॉ.अमृत महाजन,मनिषा पाटील,सुलोचना साबळे,संगीता सातपुते,मालु नरवाडे,संध्या चव्हाण,वंदना पाटील,सुरेखा कोळी,विद्या सनेर,शोभा पाटील,सुनिता बडगुजर,वृंदा पाटील,वनिता मोरे,भारती माळी,रेखा पाटील,वंदना सोनार,संगीता पाटील,उषा पाटील,सुरेखा कोळी यांच्यासह जिल्हाभरातील 250 आशा सहभागी झाल्या होत्या.