आशादीप महिला वसतिगृहात धान्य वाटप

0

जळगाव । जळगाव येथे रणविजय फाऊंडेशनतर्फे जनतेसाठी अनेक उपक्रम संस्था राबवित आहे. संस्थेच्या वतीने शहरातील शासकीय आशादीप महिला वसतीगृह, अनाथ, निराधार, निराश्रीत व संकटात सापडलेल्या प्रवेशिता यांचे करीता 50 किलो गहु व 50 किलो तांदुळ असे धान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल संस्थेच्या अधिक्षिका यांनी संस्थेचे आभार व्यक्त करुन त्यांना सामाजिक कार्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.

यांचे लाभले सहकार्य
या उपक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष – समीर अहमद शेख अमीर, उपाध्यक्ष – सै. जमीर सै. अहमद, खजिनदार- नदीम शेख निसार शेख, सचिव – शरिफ शेख फारुक शेख, सहसचिव- शेख नाविद शेख मुश्ताक व सभासद – सै. तारीक अली लियाकत अली, शेख तौसिक शे. मुख्तार, समीर खान इलियास खान यांचे सहकार्य लाभले.