आशाबाबा नगरातील महिलेची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या

0

बजरंग बोगद्याजवळील घटना ; शोध घेणार्‍या आई, वडीलांमुळेच पटली ओळख

जळगाव – गोळ्या औषधी तसेच दोन पाण्याच्या बाटल्या एका प्लास्टिकच्या पिशवीत सोबत घेत धनश्री पंकज वसाने वय 26 रा. आशाबाबा नगर हिने रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ घडली. बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या शोधासाठी आई, वडील घराबाहेर पडले. यानंतर थेट तिचा मृतदेह आढळून आला. दरम्यान धनश्री हिचे पतीचे निधन झाले असून ती विधवा आहे, तसेच ती मनोरुग्ण असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे.

शहरातील आशाबाबा नगर येथे श्रीराम राजाराम चौधरी हे पत्नी व मुलांसह वास्तव्यास आहे. श्रीराम चौधरी हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र दीड वर्षापूर्वी त्यांची मुलगी धनश्री हिचा विवाह झाला होता. मात्र तिचे पतीचे निधन झाले. यानंतर धनश्री ही आई, वडीलांकडेच राहत होती. पतीच्या निधनानंतर अतिताण तणावातून तिचे मानसिक संतुलन बिघडले, तिच्यावर रुग्णालयात रुग्णालयात उपचारही सुरु होते.

मृतदेह बाजूला करण्यासाठी थांबली रेल्वेगाडी
डाऊन लाईनवरील खंबा क्रम. 146/29 या रेल्वे लाईनवर मृतदेह असल्याची खबर रेल्वे चालकाने स्टेशन प्रबंधकांना दिली. त्यानुसार ही माहिती रेल्वे रुळावर काम करत असलेल्या की मॅन राहूल चव्हाण, शामकुमार मनोजकुमार यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी मृतदेह डाऊन रेल्वेलाईनवर दोन्ही रुळावर आडवा पडला होता. राहूल चव्हाण, शामकुमार यांनी परिसरातील रमेश भोई यांच्या मदतीने मृतदेह रेल्वेरुळालगत बाजूला ठेवण्यात आला. यावेळी डाऊन रेल्वेलाईनवरील रेल्वे थांबली होती. जर मृतदेह हलविला नसता तर चेंदामेंदा होवून ओळख पटविण्यास अडचणी निर्माण झाल्या असत्या. दरम्यान यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. काही नागरिकांनी धनश्रीला रेल्वे लाईनवर फिरत असताना दोन ते तीन वेळा हटकले होते. मात्र यानंतरही ती पुन्हा रेल्वेरुळावर गेली व दुर्घटना घडली. तिच्यासोबत सुरेश कलेक्शन असलेली प्लास्टिकची मोठी पिशवी होती, त्यात तिच्या गोळ्या व पाण्याच्या बाटल्या होत्या.

शोध सुरु केला अन् आई, वडीलांना मृतदेहच मिळाला
मंगळवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास आई मुलाला घेण्यासाठी शाळेत गेली. यावेळी घरी एकटी असलेली धनश्री सेाबत तिच्या गोळ्यांची थैली तसेच दोन पाण्याच्या बाटल्या घेवून घराबाहेर पडली. शाळेतून परतल्यावर तिच्या आईला धनश्री दिसून आली. त्यांनी पती श्रीराम यांना फोनवरुन प्रकार कळविला. माहिती मिळताच श्रीराम चौधरी घरी आले व पत्नीसह त्यांनी शोध सुरु केला. परिसरात सर्वत्र शोध घेत असताना बजरंग बोगद्याजवळ रेल्वलाईनवर त्यांना गर्दी दिसून आली. जावून बघितले असता, तो मृतदेह धनश्रीचा हिचाच होता. याठिकाणी आई, वडीलांनी हंबरडा फोडला. रामानंदनगर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. दरम्यान यापूर्वी एकवेळा धनश्री बेपत्ता झाली होती. त्याबाबत पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती. यावेळी धनश्री पुन्हा घरी परतली होती.