आशाबाबा नगरात आयटी इंजिनिअरच्या घरातून 55 हजारांचा एैवज लांबविला

0

रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत सलग दुसर्‍या दिवशी घरफोडी

जळगाव- शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आदर्शनरात इन्शुरन्स कंपनीच्या अधिकार्‍याचे घर फोडल्याची घटना रविवारी समोर आली होती. या घटनेला 12 उलटत नाही तोच सोमवारी सकाळी 11 आशाबाबा नगरात विनय अरुण वाणी या आयटी इंजिनिअरचे घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिणे असा 55 हजारांचा एैवज लांबविला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

कानबाईच्या पूजेसाठी गेले होते मूळगावी
आशाबाबा नगरात विनय वाणी हे पत्नी श्रध्दा व हिमांशू, भूमिका या कुटूंबियांसह ते वास्तव्यास आहेत. विनय वाणी हे अशोक बिल्डकॉन या कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. ती पत्नी श्रध्दा ह्या घरीच प्ले व नर्सरी स्कूल चालवितात. रविवारी त्यांच्या मूळ गावी जळगाव तालुक्यातील आसोदा येथे सर्व कुटूंब गेले होते. सोमवारी कामावर जायचे असल्याने विनय वाणी हे आसोदाहून थेट पाचोरा येथे साईट सुरु असल्याने त्याठिकाणी गेले. पत्नी श्रध्दा ही मुलांसह आशाबाबा नगरातील घरी परतली.

कपाटातून रोकड व दागिणे लांबविले
श्रध्दा या घरी परतल्या असता त्यांना मुख्य लोखंडी गेटला कुलूप तर आतील लाकडी दरवाजाला कडी लावलेली दिसून आली. घरात प्रवेश केला असता, कपाटातील सर्व कपडे व सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. चोरीची खात्री झाल्यावर श्रध्दा यांनी त्यांचे पती विनय वाणी यांना फोनवरुन प्रकार कळविला. तेही कामावरुन थेट आशाबाबानगरात आले. चोरट्यांनी गेटवरुन उडी मारुन कुलूप तोडून घरात प्रवेश केला. व कपाटातील सोन्याची 5 ग्रॅमची अंगठी, 2 ग्रॅमची अंगठी, 2 सोन्याचे पदक, 1 चांदीची चैन, 1 चांदीची अंगठी व श्रध्दा यांचे शाळेतून आलेले 22 हजार रुपये असा 55 हजारांचा एैवज लांबविला. चोरट्यांनी हॉलमधील शोकेसमधील गल्लाही फोडून त्यातील हजार रुपयांची चिल्लर लांबविली. कुलूप चोरट्यांनी घराच्या शेजारी ठेवले होते. माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.