मुंबई : दिग्गज गायिका आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रात चांगली निर्मिती होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. आशाजी गेली ७ दशके संगीत उद्योगाचा हिस्सा राहिल्या आहेत.
आशाताई म्हणाल्या, ”संगीत उद्योगामध्ये अनेक गायक- गायिका प्रवेश करीत आहेत. आजकाल आम्ही चांगल्या संगीताची निर्मिती करीत नाही आहोत, त्यामुळे आपली प्रतिभा सिध्द करण्याची संधी मिळत नाही.” आशा भोसलेनी ही खंत व्यक्त केल्यामुळे संगीत क्षेत्रात याचा गांभिर्याने विचार व्हायला हवा.