जळगाव। महाराष्ट्रात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत सुमारे साठ हजार आशा स्वयंसेविका आणि सुमारे पाच हजार गटप्रवर्तक गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. शासन त्यांना कामावर आधारित मोबदला देते. त्यांना नोकरीची कोणतीही हमी व शास्वती दिली गेलेली नाही. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाबरोबर अनेकदा चर्चा झालेली आहे. परंतु शासनाने त्यांच्या खालील मागण्या आजतागायत मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे खालील मागण्यांकडे शासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक दि. 10 ऑगस्ट 2017 रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहे.
या आहेत मागण्या
स्वयंसेविका व गटप्रर्वतकांचा शासकिय कर्मचार्यांचा दर्जा देण्यात यावा. दरमहा अनुक्रमे 7 हजार व दहा हजार रुपये मानधन , कामावर आधारित मोबादल्याचे दर दुप्पटिने वाढविण्यात यावेत, गणवेशाकरीता एक हजार रुपये देण्यात यावेत, गणवेशाकरीता एक हजार रुपये देण्यात यावेत, मोबाईल खर्च देण्यात यावा, दरवर्षी भाऊबीज भेट, राज्य विमा योजना लागू करण्यात यावी, आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतकांना अंगणवाडी कर्मचार्यांप्रमाणे जनश्री विमा योजना लागू करण्यात यावेत, बाळंतपणाच्या केससाठी सहाशे रुपये देण्यात यावेत, लाभार्थ्याकरीता आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्यकीट तसेच आरोग्यविषयी माहिती नोंदणीसाठी रजिस्टर स्टेशनरी पुरविण्यात यावी.
सहभागाचे आवाहन
अनेक वर्षांपासून सातत्याने मागण्या केलेल्या या प्रलंबित विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 10 ऑगस्ट 2017 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे ज्येष्ठ कामगार नेते व संघटनेचे मार्गदर्शक श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली होणार्या राज्यव्यापी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतकांनी सहभागी व्हावे, असे संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील, कार्याध्यक्षा श्रीमती माया परमेश्वर,उपाध्यक्ष युवराज बैसाणे, सरचिटणीस अॅड. गजानन थळे यांनी कळविले आहे.