‘आशिकी 3’मध्ये दिसणार आलिया आणि सिद्धार्थ

0

बॉलिवुड बॉक्स ऑफिसवर ‘आशिकी 2’ चित्रपटाने यश मिळवल्यावर निर्माता मोहित सूरी आता ‘आशिकी 3’च्या तयारीला लागले आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी ‘स्टुडन्ट ऑफ द ईयर’ या चित्रपटात काम करणारी जोडी आलिया आणि सिद्धार्थ यांची निवड केली आहे. सूत्रांनुसार, सिद्धार्थ याने चित्रपट ‘इत्तेफाक’साठीचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. सध्या तो नीरज पांडे निर्मित चित्रपट ‘अय्यारी’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सोबत मागील काही आठवड्यापासून अनेकदा शुटींगमधून वेळ काढून सिद्धार्थ मोहित सूरी यांच्या कार्यालयात गेल्याचे दिसले. त्यांच्या कार्यालयात सध्या ‘आशिकी 3’ चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम सुरू केले आहे. फिल्मचे निर्माता मोहित सुरी यांचा सिद्धार्थसोबत हा दुसरा चित्रपट असणार आहे आणि आलिया भटसोबत पहिला चित्रपट असणार आहे. आलिया सध्या मेघना गुलजार यांंचा चित्रपट ‘राजी’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यानंतर ती नोव्हेंबरमध्ये ‘गुल्ली बॉय’ नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे.