आशियाई कुस्तीत हरप्रीतला दुसरे कांस्य

0

नवी दिल्ली । आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या हरप्रीत सिंगने ग्रीको-रोमन विभागातील 80 किलो गटात कांस्यपदक पटकावत लागोपाठ दुसर्‍यांदा कांस्यपदकावर मोहर लावली. त्याचा सहकारी गुरप्रित सिंगला मात्र पदक मिळवण्यात अपयश आले.

पहिल्या दिवशी हरप्रीतने चीनच्या जुनजेई ना याच्यावर 3-2 अशी मात केली. या लढतीमधील पहिल्या फेरीत 1-1 अशी बरोबरी होती. मात्र नंतरच्या फेरीत हरप्रीतने चांगले डावपेच करीत आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत टिकवली. शेवटच्या 30 सेकंदांत चीनच्या मल्लाने एक गुण मिळवत रंगत निर्माण केली होती. परंतु हरप्रीतने नंतर उत्कृष्ट डावपेच करीत विजयश्री मिळवली.