आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक

0

नवी दिल्ली । आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय पैलवान बजरंग पुनिया याने कोरियाच्या स्यून्गचुल लीवरवर मात करून आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ही लढत पुनियाने 6-2 अशा गुणांच्या फरकाने जिंकली. भारताने पुरुष गटात सुवर्णपदकाची कमाई केली असली तरी महिलांच्या 58 किलो वजनी गटात भरताच्या सरिताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारताच्या सरिताला रौप्यपदकावर समाधान
नवी दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या 58 किलो वजनी गटात भारताच्या सरिताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागले. किर्गिस्तानच्या एसुलू टायनीबेकोव्हानं सरितावर 6-0 असा निर्विवाद विजय मिळवला. भारताच्या महिला पैलवानांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई करून आजवरची सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. बजरंग पुनियाच्या सुवर्णपदक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून त्याचे अभिनंदन केले आहे. पीएम मोदींनी ट्वीट केले आहे की, ”आशियाई कुश्ती चँम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या बजरंग पूनियाचे अभिनंदन. त्याच्या या विजयाचा देशाला अभिमान आहे.