आशियाई स्पर्धेत भारताला तिसर्‍या स्थानाची अपेक्षा

0

भुवनेश्‍वर । रांची शहराने ऐनवेळी आयोजनाच्या शर्यतीतून माघार घेतल्यावर 22 व्या आशियाई मैदानी स्पर्धेसाठी भुवनेश्‍वरसाठी सज्ज झाले आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या धावपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधो पुरवल्या असून स्पर्धेच्या पदक तालिकेत तिसरे स्थान मिळवण्याचे उद्दीष्ठ भारताने समोर ठेवले आहे. ओडिशाच्या  राजधानीत रंगणार्‍या या स्पर्धेत 45 देशांचे सुमारे 800 पेक्शा जास्त धावपटू 42 विविध क्रीडा प्रकारामच्या स्पर्धेत आपले आव्हान देतील. भारत तिसर्‍यांदा स्पर्धेचे यजमानपद भुषवत आहे. याआधी भारतात 1989 मध्ये दिल्लीत, 2013 मध्ये पुणे येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. नेहमीप्रमाणे या अजिंक्यपद स्पर्धेकडे इतर देशांच्या प्रमुख धावपटूंनी पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे प्रत्येक दोन वर्षांनंतर होणार्‍या या स्पर्धेची चमक फिकी पडली आहे.

हे महत्त्वाचे खेळाडू नाहीत
मागील आशियाई स्पर्धेत दुसर्‍या स्थानावर राहिलेल्या कतारने आपल्या 10 जणांच्या संघात लांब उडीतील आघाडीचा खेळाडू मुस्ताझ इसा बार्शिमचा समावेश केलेला नाही. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक्स महासंघाच्या डायमंड लीग मालिकेतील दोहा येथे झालेल्या स्पर्धेत मुस्ताझने सुवर्णपदक जिंकले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत बहरीनला सुवर्णपदक जिंकून देणारा रॅथ झेबेत, कझाकीस्तानची तिहेरी उडीतील महिला खेळाडु ओल्गा रिपाकोव्हा (रिओमध्ये कांस्यपदक) आणि जपानचा छोट्या पल्ल्यातील हुकमी धावपटऐ अब्दुल हाकिम सानी ब्राऊन देखील या स्पर्धेत सहभागी झालेला नाही.