आशियात 95 टक्के नवीन HIV रुग्ण

0

नवी दिल्ली । एचआयव्हीबाधित जगातील एकूण नवीन रुग्णांपैकी भारत, चीन आणि पाकिस्तान यांसह 10 देशांमध्ये 95 टक्के रुग्ण आढळूण आले आहेत, असा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. या दहा देशांमध्ये भारत, चीन, इंडोनेशिया, पाकिस्तान, व्हिएतनाम, म्यानमार, पपुआ, फिलिपाईन्स, थायलँड आणि मलेशिया या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये विविध कारणांनी एचआयव्हीची लागण वाढत आहे. मुख्यत्वे लोकसंख्या हेही यामागील प्रमुख कारण असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

वेश्याव्यवसाय, समलिंगी संबंधामुळे लागण
1वेश्या व्यवसाय, समलिंगी संबंध यामुळेही याची लागण पसरत आहे. त्याचबरोबर जे अम्लीपदार्थाच्या आहारी गेलेले आहेत, त्यांनाही मोठ्या प्रमाणात एचआयव्हीची लागण होत आहे.
2 मागील मागील सहा वर्षांच्या तुलनेत एचआयव्हीची लागण होण्याच्या प्रमाणात 13 टक्क्यांनी घट झाली आहे. 2010 साली खंडात 3 लाख 10 हजार जणांना एचआयव्हीची लागण झालेली होती.
3 तिच 2016 मध्ये 2 लाख 70 हजार इतकी खाली घसरली आहे. 26 शहरांमध्ये यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. एचआयव्ही संबंधी जनजागृती करण्यात येत असली तरीही समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे.