आशिया करंडक : टकले तिसर्‍या स्थानी

0

पुणे । आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने आशिया पॅसिफिक रॅली मालिकेतील होक्कायडो रॅलीत आठ तासांची पेनल्टी बसूनही आशिया करंडक गटात तिसरा क्रमांक मिळवला. एकूण क्रमवारीत तो पंधरावा आला. जपानमधील होक्कायडो बेटावर ही रॅली शनिवारी व रविवारी पार पडली. भारताचा गौरव गिल सर्व साधारण तसेच गटात विजेता ठरला. संजयचा इम्पार्ट संघातील सहकारी रिचर्ड ब्लॉमबर्ग गटात दुसरा आला. संजयसह तब्बल सहा जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे माघार घ्यावी लागली. संजयला पहिल्या लेग पूर्ण करता आला नाही पण त्याने नव्या उत्साहात रविवारी सुपर रॅलीत भाग घेतला. सॅमो सात्सुनाई या सुपर स्पेशल स्टेजमध्ये त्याने 7 व्या क्रमांकावर झेप घेत टॉप टेनिस फिनिश नोंदविला.

दुसरा लेगमध्ये संजय 18 स्पर्धकात 12 वा आला. त्याने 49 मिनिटे 33.4 सेकंद वेळ नोंदविली. संजयने 5 बोनस गुणांसह एकूण 20 गुणांची कमाई केली. आशिया करंडक गुण तालिकेत तो तिसरा आहे. नवी कार वेगवान आहे. तिच्याशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागणे स्वाभाविक आहे. त्यासाठी जास्त सराव आणि स्पर्धात्मक सहभागाची गरज आहे. असे संजयने सांगितले. निकाल आशियाई करंडक : गौरव गिल स्टीफन्स प्रीव्होट टीम एमआरएफ (1तास53 मि. 21.8 से.), ब्लॉमबर्ग-लार्स अ‍ॅडरसन इम्पार्ट स्पोर्ट (2:5:03.2), संजय टकले-नोरिको ताकेशिता इम्पार्ट स्पोर्ट (10:22:10.7)