आशिया खंडातील भ्रष्ट देशांच्या यादीत भारत पहिला

0

नवी दिल्ली । ना खाऊंगा ना खाने दूंगा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक कार्यक्रमांमध्ये बोलताना म्हणतात. 2014च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा मुद्दा मोदींच्या अजेंड्यावर होता. मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही. फोर्ब्सकडून प्रसिद्ध झालेल्या यादीत आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांत भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

फोर्ब्सच्या यादीने काढले व्यवस्थेचे लक्तरे
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे मोदींना देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे असल्यास अजून बरेच प्रयत्न करावे लागतील, असे दिसून येते.
येथे प्रमाण कमी ः चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण भारतापेक्षा कमी
येथे प्रमाण जास्त ः भारत, व्हिएतनाम, थायलंड, पाकिस्तान आणि म्यानमार

निम्म्याहून अधिकांना लाच द्यावी लागते
‘भारतातील सहापैकी पाच सेवा सार्वजनिक सेवांसाठी लाच द्यावी लागते. शाळा, रुग्णालय, ओळखपत्र, पोलीस क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक व्यक्तींनी या क्षेत्रातील कामे करुन घेण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याची माहिती दिली,’ असे फोर्ब्सने लेखात म्हटले आहे. मात्र फोर्ब्सने भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी मोदींचे कौतुकदेखील केले आहे.