आशिया चषकाच्या वेळापत्रकावर सेहवाग नाराज

0

नवी दिल्ली-भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने, आशिया चषकाच्या व्यस्त वेळापत्रकावर कठोर शब्दात टीका करत संताप व्यक्त केला आहे. यंदाचा आशिया चषक दुबई आणि अबुधाबी शहरात खेळवला जाणार आहे. १५ सप्टेंबरपासुन सुरु होत असलेल्या स्पर्धेत भारताला १८ आणि १९ सप्टेंबररोजी लागोपाठ दोन सामने खेळायचे आहेत. १९ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे. तर १८ सप्टेंबर रोजी भारताचा प्रतिस्पर्धी कोण असणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र हे वेळापत्रक भारतीय खेळाडूंसाठी दमवणारे असल्याचे विरेंद्र सेहवागने सांगितले आहे.